कृषी क्षेत्रात परफेक्ट मार्गदर्शनासाठी परफेक्ट मार्केटचा वर्धापन दिन प्रेरणादायी :-डॉ भारती पवार
वैभव गायकवाड

नासिक – येथे परफेक्ट कृषी मार्केटचा वर्धापन दिन व शेतकरी मेळावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थित संपन्न.
यावेळी डॉ भारती पवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. शेतीशास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करून शेती उत्पन्न वाढवावे सेंद्रिय शेती भाजीपाला व फळबाग शेतीचे व्यवस्थापन साठवणुकीचे आधुनिक तंत्रज्ञान, पशुसंवर्धन योजना माहिती अशा कृषी क्षेत्राशी निगडित अनेक बाबींचा शेतकरी बांधवांनी विविध शेती विचारवंतांची मार्गदर्शन घेऊन आपली शेती उत्तम दर्जाची करण्यास भर द्यावा असे डॉ भारती पवार मत व्यक्त केले.
यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानी फरांदे,परफेक्ट मार्केटचे संचालक बापूसाहेब पिंगळे,प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी, नाना कर्पे, नाना शिलेदार, सुनील केदार, बाळासाहेब कर्डक, मानकर दादा,परफेक्ट मार्केट कंपनी चे संचालक, सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते.