सांडपाण्याचे निवारण नसल्यामुळे अश्विनी नगर मध्ये थेट कॉलनीतील घरांमध्ये पावसाचे पाणी
ज्ञानेश्वर पोटे

मनमाड येथे दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी जाण्यासाठी छोटीशी नाली असल्यामुळे पाणी थेट अश्विनी नगर मधील बऱ्याच घरात घुसले होते. त्यामुळे परिसरातल्या सर्व घरांमध्ये खराब पाणी घुसल्यामुळे सर्व वातावरण दूषित होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी काढण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती.त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनमाड महिला शहराध्यक्ष रोहिणी ताई गागरे यांनी नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ.वैशालीताई सोनवणे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी सामाजिक कार्यकर्ते व चांदवड तालुका प्रतिनिधी श्री.भागवत झाल्टे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली व झाल्टे यांनी प्रत्यक्षात पाहणी केली.आपल्या चांदवड तालुका कार्यक्षेत्राची मर्यादा ओलांडून त्यांनी समाजसेवेचे काम केले.
त्यांनी त्वरित रेल्वे बायपास चालू असलेल्या ठेकेदारांशी संपर्क साधून बायपास कामासाठी चालू असलेले पोकलेन मशीन आणून अश्विनी नगर येथील रेल्वे बायपास लगत संपूर्ण नाली करून सांडपाणी काढून काम पूर्ण केले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनमाड महिला शहर अध्यक्ष रोहिणी ताई गागरे नासिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैशालीताई सोनवणे चांदवड व सामाजिक कार्यकर्ते श्री भागवत झाल्टे यांचे अश्विनी नगर येथील महिला व ग्रामस्थांनी वेळेचे तत्पर्य राखून त्वरित मदत केल्याबद्दल आभार मानले.