जि.प. प्राथ. सेमी इंग्रजी शाळा पिंपळस रामाचे येथे

दि.15/06/2024 रोजी जि.प. प्राथ. सेमी इंग्रजी शाळा पिंपळस रामाचे येथे प्रवेशोत्सवानिमित्त समाजकल्याण अधिकारी मा. *योगेश पाटील साहेब*, समाजकल्याण निरीक्षक मा. *वैशाली ताके* मॅडम तसेच निफाड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. *विजयजी बागूल* साहेब यांनी भेट दिली. साहेबांच्या हस्ते सर्व नवागतांचे स्वागत करण्यात आले, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. बैलगाडी मधून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्य, सर्व ग्रामस्थ पालक, शिक्षणप्रेमी तरुण मित्र मंडळ, जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
अशा प्रकारे प्रवेशोत्सव मेळावा यशस्वीरित्या आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.