जामले हातगड येथे 13 डिसेंबर 2023 रोजी यात्रोत्सव कुलदैवत डोंगरदेव व उन्हाबाळ कणसरा माता यात्रोत्सव जामले हातगड
माधव आहेर

कळवण : आदिवासी भागाभागातील बाधवांत कुलदैवत डोंगरदेव व उन्हाबाळ कणसरा माता यांना विशेष महत्व दिले जाते देवदीपावलीच्या दुसऱ्या चंद्र दर्शनपासून ते मार्गशीर्ष पौर्णिमे पर्यत पंधरा दिवसासाठी सुरुवात होते.
म्हणून जामले हातगड येथील नि-हळ डोंगराच्या कुशीत असलेले तीर्थक्षेत्र गोधणपाणी येथे आदिवासी कुलदैवत डोंगरदेव उन्हाबाळ व कणसरा मातेची यात्रा सालाबादप्रमाणे भरविण्यात येते. डोंगरदेव कार्यकम नि-हळ डोंगराच्या कुशीत बसलेले आणी निसर्गाच्या सान्निध्यातील हे तीर्थक्षेत्र खासकरुन यात्रेकरूणा आकर्षित करते. या यात्रेमध्ये वेगवेगळया भागातून आदिवासी बांधव आपली कला, संस्कृती तसेच पारंपारीक नृत्र सादर करतात. यात्रेच्या पहिल्या दिवशी पावरीच्या तालावर नाचत गाजत ध्वज मिरवणूक गावामधून काढुन नि-हळ डोंगराच्या मंदिरापाशी लावला जातो. आणी संध्याकाळी थाळ गायन व डोंगरदेव नृत्य जागरण केले जाते. यात्रेच्या दिवसी यात्रोत्सव लोकप्रतिनिधी मंत्री,व आदिवासी बांधव उपस्थिती लावतात.