डॉ. भारती ताईला निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करू :- महायुतीच्या मेळाव्यात निर्धार
वैभव गायकवाड

दिंडोरी लोकसभा महायुती पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा दिंडोरी येथे संपन्न झाला.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, माजी आमदार धनराज महाले,सुनील पाटील यांनी प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करत पाच वर्षापासून ताईंनी शेतकऱ्यांसाठी प्रश्न सातत्याने मांडले तसचे केलेली विकास कामे जनता विसरणार नाही आणि शेतकरी देखील विसरणार नाही याची देखील आठवण करून दिली.
यावेळी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी एनडीए आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प करुयात आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ भारती ताई पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प यावेळी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी सुरेश डोखळे, ,सुनील बच्छाव ,चंद्रकांत राजे, राजेंद्र उफाडे,आनंदराव चौधरी, राजाभाऊ सोनवणे, नरेंद्र जाधव, मनीषाताई बोडके, उज्ज्वला कोथळे, शरद कासार ,तुषार वाघमारे, सुनील पवार ,वैभव महाले, ज्योतीताई देशमुख, श्याम मुरकुटे,अमोल कदम, लक्ष्मणराव गायकवाड ,श्याम बोडके, रवींद्र गांगोले, चंदू पगार, सुरेश देशमुख,अमर राजे, आदित्य केळकर ,बाबा पिंगळ सह आदी उपस्थित होते.