ताज्या घडामोडी

औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटे डंपर आणी खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने 12 प्रवाश्यांचा मृत्यू झाला .

संपादक सोमनाथ मानकर

औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटे डंपर आणी खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने 12 प्रवाश्यांचा मृत्यू झाला . 32 व्यक्ती जखमी आहे यात 10लहान मुलांचा देखील समावेश आहे .10पुरुष 1 महिला यांचा समावेश आहे अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जात आहे . अपघातग्रस्त बस ही चिंतामणी ट्रॅव्हलची आहे . यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती . पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली . अपघातानंतर बसने पेट घेतला .

गाढ झोपेत असणारे प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला . बसमध्ये किती प्रवासी असतिल यांचा तपास चालू आहे काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे आस पासच्या लोकांनी सांगितले . या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले . अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते . मयत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला . बसमधील 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले .

यवतमाळहून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ही बस निघाली होती . सकाळी सव्वा पाच वाजता ती या चौकात अपघातग्रस्त झाली . बसमध्ये एकूण किती प्रवासी होते .याचा तपास सुरू आहे आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन – तीन जणांना वाचवले . मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे . प्रत्यक्षदर्शीकडून माहिती दिली की. बस , डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला . डंपरचालक फरार आहे . अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. तसेच अपघातग्रस्तांना भेटण्यासाठी तातडीने छगन भुजबळ हे जिल्हा रुग्णालयात हजर झाले व जखमींची विचारपूस केली व मुख्यमंत्री साहेब यांच्या शी फोनवर बोलणे केले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे मुख्यमंत्री घटनास्थळाला देखील भेट देणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे या दुर्घटनेत १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.