चासनळी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्य. उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री जुंधारे एस.एम. यांनी भूषविले होते. याप्रसंगी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी श्रीम.गावित एम.जे. यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्याबद्दल तसेच स्वराज्याबद्दल असलेले योगदान व त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची माहिती सांगितली. तसेच त्यांच्यामध्ये उत्तम संघटन कौशल्य होते. त्यामुळे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील असे कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक श्री. जुंधारे एस.एम. यांनी सांगितले.
याप्रसंगी कु.अमृता गाडे,सृष्टी शेळके,शरण्या गाडे,मयूर खैरनार,अक्षदा बोडखे, प्रिया चांदगुडे, शिवानी जगताप,प्रगती नागरे,वैष्णवी कांगणे,समीक्षा गाडे,अनुष्का गायखे,समृद्धी थोरात,हर्षदा गायके,सिद्धी पगारे,सृष्टी तिडके,शिवम जगताप,कार्तिक उपाध्याय,अनुष्का जाधव,साक्षी सानप,चैताली गरुड,लक्ष्मी आहेर,श्रावणी भोसले,वैष्णवी चांदगुडे,तनिष्का चांदगुडे,कमलेश सोनवणे,सोहम गांगुर्डे, कु.रिया पाऱ्हे, शितल गायकवाड,राणी भोसले या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9 वी अ च्या विद्यार्थिनी कु. सई चांदगुडे,कु. वैष्णवी डोंगरे,लक्ष्मी आहेर यांनी केले. तर आभार कु. आकांक्षा बारगळ यांनी मांडले. या कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन कलाशिक्षक श्री आडेप पी.व्ही. यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. मोरे आर. के. पारधे ए.एम. सारबंदे एन.एच., वाघ एम.जी. वसावे एम. व्ही, गायखे एस.एस, पवार आर. बी, पेटारे ए.बी.,काशीद एस.एस.पवार एस. एस, मंडलिक एस. टी. या सर्व सेवकांनी प्रयत्न केले.