
भाटगांव- आज दिनांक 4/5/2024 रोजी नाशिक येथील मित्राच्या सोबत नेमिनाथ जैन माध्यमिक उच्च माध्यमिक येथे परीक्षा देण्यासाठी आलेला असता परीक्षा देण्यासाठी मित्र पेपरला गेला,त्या वेळी मात्र उर्वरित मित्र सोहम राम कोळी वय 17 नासिक ,संकेत सुभाष तोंडे नासिक खर्जुल मळा,हर्ष राजेंद्र मोरावरकर नाशिक हे तीन मित्र पेपर सुटण्यास टाईम असल्यामुळे आपण येथील नेमिनाथ कॉलेज च्या पाठीमागील रासलिंग डोंगर या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन येऊ या निमित्ताने तिघेजण डोंगरावर गेले असता, त्यावेळेस सोहम राम कोळी वय 17 राहणार नाशिक रो, नाशिक याचा डोंगरावरून पाय घसरून खाली पडला त्यामध्ये तो जखमी झाला. त्याच्यासोबत असलेले दोन मित्रांनी आरडाओरडा करून शेजारी असलेले बारकू गांगुर्डे ,राजू सोनवणे ,दीपक जाधव ,विजू नवरे ,रवी गांगुर्डे, रिजवान शहा, प्रवीण गांगुर्डे ,कृष्णा पवार ,बाळा गांगुर्डे ,ज्ञानेश्वर गांगुर्डे ,भैय्या गांगुर्डे ,राहुल पवार, जाहीर माळी ,साहेबराव वाघ ,सुनील मोरे ,या आदिवासी ग्रुपने त्यास बाहेर काढून पोलीस स्टेशनला फोन द्वारे खबर दिली .त्यावरून चांदवड पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार विजय जाधव,
पोलीस हवालदार अशोक पवार,पोलीस नाईक दिनेश सुळे,
पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पवार,
पोलीस कॉन्स्टेबल तानाजी शिंदे घटनास्थळी जाऊन मदत केली व त्यास प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले .व त्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले गिर्यारोहक ट्रॅकर श्री.भागवत झाल्टे यांनी अशी सविस्तर माहिती दिली.सध्या टेंपरेचर 40℅ ते 42% टेंपरेचर पार केले आहे,तरी सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्या व उन्हामध्ये कोणतेही गड,किल्ले चढू नये अशी सविस्तर माहिती चांदवड तालुक्यातील गिर्यारोहक समाजसेवक श्री.भागवत झाल्टे यांनी समाज माध्यमांना दिली.