चांदवड तालुका मविप्र समाजाच्या सभासदांचा कृतज्ञता सोहळा व सभासद आणि हितचिंतकांच्या वतीने नूतन कार्यकारिणीचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न..
संपादक.सोमनाथ मानकर

चांदवड येथील
श्रीमती जे.आर.गुंजाळ विदयालयातील श्री रेणुका क्रीडा व सांस्कृतिक हॉलमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नूतन कार्यकारिणीच्या वतीने तालुक्यातील सभासद व हितचिंतकांचा कृतज्ञता सोहळा आणि तालुक्याच्या वतीने कार्यकारिणीचा सत्कार सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेचे माजी संचालक-जेष्ठ सभासद डॉ.बाजीराव रकीबे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या आद्य संस्थापकांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांदवड तालुका संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी करून सर्व सभासदांचे आभार मानले तसेच आपल्या मविप्र रुग्णालयात सर्व सभासद व गरजू नागरिकांना तत्परतेने वैद्यकीय सेवा मिळेल,अशी ग्वाही दिली. तालुक्यातील सभासदांच्या वतीने श्री पोपटराव पवार यांनी मनोगत व्यक्त करताना चांदवड तालुक्याला चांगले दिवस येण्याची सुरुवात आहे असे सांगितले तर उपसभापती देवराम मोगल यांनीही सभासदांना धन्यवाद देत पुढेही चांदवड तालुक्याला आमचा भक्कम पाठिंबा राहील, असे आश्वासन दिले.
संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी ही भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी हा सोहळा आयोजित केल्याचे सांगितले.संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी जिल्ह्यातील सर्व सभासदांनी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला व मतदान केले आणि हे पण दाखवून दिले की चुकीचे काम केले की लोक माफ करत नाही, ठाकरे साहेबांच्या रुपाने चांदवड तालुक्याला नेतृत्व करण्याची संधी मिळवून दिली असली तरीही सरचिटणीस नितीन ठाकरे कधीही प्रांतभेद करत नाही, सर्व जिल्ह्यातील सभासदांना नेहमी आपलेच असल्याचे जाणवते, असे नमूद केले. यानंतर सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे यांनी सभासदांच्या व इतर मुलांसाठी MPSC ,UPSC व सैनिकी स्कूल सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले,सेवकांनीही कुठल्याही दडपण न घेता प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम करावे, संस्थेच्या उज्ज्वल परंपरेत वाढ कशी होईल ,यासाठी आमची
कार्यकारिणी काम करणार आहे.संस्थेच्या विकासात कुठलेही राजकारण आणू नये, स्कूल कमिटीची नेमणूक शाळेच्या विकासासाठी केली जाते. त्यामुळे त्यात जास्तीतजास्त चांगल्या लोकांची निवड केली जाईल, प्रत्येक गोष्ट करताना पारदर्शकता जपली जाईल. संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीवर भर देण्यात येईल, आम्ही ही माणसं आहोत आमच्याकडूनही काही चुका होऊ शकतात ,त्याबद्दल माफ करून मार्गदर्शन करावे असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रकिबे यांनी भावी काळात चांदवडला संस्थेचे बी.ए.एम.एस. काॅलेज सुरू करावे अशी मागणी केली .संस्थेचे माजी सेवक विजय आहेर यांनी संस्थेला एक लाख रुपये देणगी दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कार्यकारिणीचे तालुका सदस्य ऍड.संदीप गुळवे,ऍड.आर. के. बच्छाव,प्रवीण जाधव, ऍड. लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख,डॉ.प्रसाद सोनवणे,अमित बोरसे, नंदकुमार बनकर, रमेश पिंगळे,विजय पगार,महिला सदस्य शालन सोनवणे, शोभा बोरस्ते, सेवक सदस्य एस.के.शिंदे, सी.डी. शिंदे व जगन्नाथ निंबाळकर यांसह तालुक्यातील सर्व सभासद, हितचिंतक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.