
अमळनेर पोलिसांनी सापळा रचून गुजरात पासिंग ४ चाकी वाहनातून अंदाजे ५० किलो गांजा जप्त केला.
तर आरोपी पोलिसांना पाहून फरार झाले. ही कारवाई अमळनेर गांधली रस्त्यालगत विजय नवल पाटील कृषी महाविद्यालय मागे गुरुवारी मध्यरात्री केली.
अमळनेर मार्गे गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकार्यांसह सापळा रचला. रात्री १ वाजेच्या सुमारास गुजरात पासिंग ४ चाकी वाहन आणि १ दुचाकी गांधली रस्त्यालगत विजय नवल पाटील कृषी महाविद्यालय मागे दिसुन आली. पोलिसांची चाहूल लागताच दोघे संशय तेथून पसार झाले. पोलीस पथकाने वाहनाची तपासणी करून अंदाजे ५० किलो गांजा पकडला. गांजासहा ४ चाकी वाहन आणि जावा लाल कलरची २ चाकी जप्त केली. ही कारवाई स्वतः पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पथकात सहभागी होऊन मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, रवी पाटील, दीपक माळी, सुनील पाटील, शरद पाटील, यांनी केली