अमळनेर पंचायत समिती कार्यालयात गटशिक्षणाधिकारी यांना धक्काबुक्की
अमळनेर शहरातील पंचायत समिती कार्यालयात गटशिक्षणाधिकारी यांनी मंगळवार 16 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता बैठक घेतली या बैठकीत अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शाळेचे संस्थाचालक भटू मुरलीधर पाटील यांना बोलाविलेले नसताना देखील भटू पाटील हे बैठकीला आले, दरम्यान यावेळी गटशिक्षणाधिकारी या नात्याने रावसाहेब मांगो पाटील यांनी बटू पाटील यांना शाळेतून सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेसाठी दाखला न देण्याच्या कारणा विचारले त्याचा राग आल्याने जाऊ खेडे येथील शाळेचे संस्थाचालक भटू पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांना धक्काबुक्की करत डोळ्यावर मारले तसेच उपस्थित असलेल्या सभासदांच्या समोर अश्लील शिवेगाळ धमकी किल्ल्याचा प्रकार घडला आहे या संदर्भात गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी अमळनेर पोलीस सात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी चार वाजता जवखेडा येथील शाळेचे संस्थाचालक बटू मुरलीधर पाटील यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे हे करीत आहेत.