नाशिक मध्ये काळ्या जादूची छाया? नाशिकमध्ये दुर्मिळ वनस्पतीची तस्करी करणाऱ्या एका टोळीला केले जेरबंद
नाशिक प्रतिनिधी

नाशिक जादू हौस आणि औषधी वापरासाठी अनेक दुर्मिळ वनस्पतीची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. डी आर आय ने नाशिक जवळ मोठी कारवाई केली. या कारवाईत 781 बंगाल मॉनिटर लिझार्ड हेमीपेनेस आणि 19.6 किलो साफ्ट कोरल म्हणजे( इंद्रजाल) जप्त करण्यात आले आहे .गुप्त माहितीच्या आधारावर वन्यजीव तस्करीच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे . ही टोळी बंगाल मॉनिटर लिझार्ड हेमिफेन्स आणि इंद्रजाल साठी संभाव्य खरेदीदार शोधत आहे या गुप्त माहिती वर कारवाई करताना डी आर आय मुंबईच्या अधिकाऱ्याच्या पथकाने या तस्करावर सापळा रचला डी आर आय ने खरेदीसाठी डमी ग्राहकही तयार केला एका तस्कराने सुरुवातीला खरेदीदारांना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्थानकावर बोलावले परंतु जवळपास तीन तास जागा बदलत राहिला अखेर जवळच्या आदिवासी वस्तीत देवाण-घेवाण करण्याचं निश्चित झालं चार चाकी वाहन जाऊ शकणार नाही अशा काटेरी झाडीपलीकडे थेट भेट निश्चित झाली. विशेष म्हणजे बाईकवर तीन ते चार तस्कराचे गट पाळत ठेवून होते डीआरआय टीमने आंबेडकर जयंती उत्सवाचा फायदा घेत.
निळे झेंडे लावून थेट घटनास्थळी पोहोचले. मात्र जवळपास 30 आदिवासीच्या टोळीने दगडफेक करीत या पथकावर जोरदार हल्ला केला. या गडबडीत तस्कर आणि यांच्या साथीदारांनी पडून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तब्बल अर्धा किलोमीटर त्यांचा पाठलाग करून तस्कर टोळीला पकडण्यात यश मिळविले. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या 781 हाताजोडी आणि 19.6 किलो इंद्रजाल जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलीस करत असून लवकरच या टोळीचा परदा पास करू असे पोलिसांनी सांगितले. आहे