लासलगाव महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील स्पर्धा परीक्षा विभागात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारतीय लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करण्याबरोबरच त्यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्टया मौलीक असे योगदान भारतीय समाजाला दिले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला व विशेषतः शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार सर तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.किशोर गोसावी उपस्थित होते. तसेच याप्रसंगी रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिल गायकर आणि प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.मोहन बागल, प्रा.प्रभाकर गांगुर्डे, प्रा.जितेंद्र देवरे, प्रा.महेश होळकर, प्रा.रामनाथ कदम, प्रा.दत्तात्रय गायकवाड, प्रा.शरद सोनवणे, प्रा.गणेश जाधव, श्रीमती दिपाली कुलकर्णी, श्रीमती लता तडवी, श्रीमती अश्विनी पवार, श्रीमती जयश्री पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा.किशोर गोसावी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगतांना त्यांचा एक जरी विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणला तरी विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल होईल असा संदेश दिला. तसेच अध्यक्षीय समारोपात पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार सर यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा आणि त्यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिल गायकर यांनी तर आभार प्रा.देवेंद्र भांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व स्वयंसेवक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.