
भाटगांव- मतदान करणे सुद्धा देश सेवाच आहे,मतदान आपला महत्त्वाचा हक्क व अधिकार आहे.लोकशाहीने आपल्याला अनेक सुविधा,अधिकार व हक्क दिले आहेत.आपला भारत देश एक लोकशाही प्रजासत्ताक आहे,जिथे लोकराज्य करतात,लोक त्यांच्या मताधिकार्याचा वापर करून अशा व्यक्तींची निवड करतात.जो देशाच्या विकासासाठी सक्षम असेल आणि देशाची सूत्रे कुशलतेने हाताळू शकेल.प्रत्येक व्यक्तीचे मत हे खूप मौल्यवान आहे.सरकार बनवण्यात देशातील प्रत्येक मतदाराची भूमिका महत्त्वाची असते.त्याच अनुषंगाने भाटगांव तालुका चांदवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथे मुलांची प्रभात फेरी काढून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला. त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर,श्री.पवार सर,श्री.गवळी सर,सौ.गायकवाड मॅडम,सौ.बच्छाव मॅडम व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.