
लासलगाव, दि. २० ( ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय माहिती क्रांतीचे जनक, पंचायतराज सशक्तीकरणाचे शिल्पकार आणि भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘सद्भावना दिवस’ साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती देशभरात ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लासलगाव महाविद्यालयात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. सर्व धर्म, भाषा आणि नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता आणि सांप्रदायिकतेमध्ये एकमेकांप्रती सद्भाव वाढविणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश्य असून, यानिमित्ताने रा.से.यो. स्वयंसेवकांना कार्यक्रमाधिकारी श्री.सुनिल गायकर यांनी आज सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.उज्वला शेळके, डॉ.संजय शिंदे, प्रा.श्रीराम कंधारे, श्री.देवेंद्र भांडे व रा.से.यो. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, आणि डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.