सप्तशृंगी मातेचे मंदिर 24 तास सुरू परंतु रात्री चे भाविकांना नाशिक जाण्यासाठी बस नसल्याने भाविकांमध्ये नाराजी
संपादक सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड

साडेतीन शक्तीपीठ पैकी आद्यपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे दिवाळी उत्सव दरम्यान सालाबादप्रमाणे होणारी भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेता सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांच्यावतीने श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे गुरुवार, दि. २७/१०/२०२२ पासून रविवार, दि. १३/११/२०२२ पावेतो दर्शनासाठी २४ तास खुले ठेवून भाविकांना श्री भगवती – श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिवाळी उत्सव कालावधी दरम्यान राज्यातील तसेच परराज्यातील विविध शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी असते, तसेच दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी गुजरात सह महाराष्ट्रातील लाखो भाविक दिवाळीच्या काळामध्ये सप्तशृंगी गडावर ती आई भगवतीच्या दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी येणाऱ्या पायी पालख्या, नवरात्र उत्सवात व मागील २ वर्षात कोरोना काळामुळे अनेक भाविक दर्शनापासून वंचित राहिले आहे त्यामुळे यावेळेस लाखोच्या संख्येने भाविक गडावरती येतील असा अंदाज पोलीस प्रशासन व देवी संस्थान यांच्या वतीने लावण्यात आल्यामुळे यावेळेस गडावरती मंदिर हेच 24 तास सुरू ठेवण्यात आलेले आहे तसेच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे
परंतु खूप महत्त्वाचा विषय निर्माण होतो तो म्हणजे एसटी महामंडळ बस या बसने रोज हजारो भावीक गडावरती येत असतात मंदिर हे 24 तास सुरू असल्यामुळे आई भगवतीची सायंकाळची आरती हि 7 वाजता झाल्यानंतर भाविकांना नाशिक या ठिकाणी जाण्यासाठी एसटी महामंडळाने रात्रीच्या वेळेस बसेस उपलब्ध करून द्यावी असे मत भाविकांनी मत व्यक्त केले आहे कारण खाजगी वाहनांने नाशिक जाण्यासाठी रात्रीच्या वेळेस 150/200 रुपये मोजावे लागतात व नांदूरी या ठिकाणी जाण्यासाठी 50 ते 70 रुपये मोजावे लागतात त्यामुळे भाविक हे नाराज होतात परंतु पर्याय नसल्यामुळे त्यांना नाईलाज असतो पर्यायी मार्ग म्हणून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो तसेच या ठिकाणी असलेले बस स्थानक गावामध्ये असलेल्या छोट्या जागेमध्ये असल्याने या ठिकाणी खाजगी वाहनांची जास्त गर्दी असते त्यामुळे बस लावण्यासाठी अडचण होते त्यामुळे अनेक वेळेस बसवाहक यांना रस्त्यावरती बस उभीं करून भावीक यांना रस्त्यावर उतरावे लागते त्यामुळे या ठिकाणी खाजगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात त्यामुळे याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष देऊन खाजगी वाहनांना ताकीद देऊन बसेस यांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गडावरील ग्रामस्थ करत आहेत कारण खाजगी वाहने आणि बस वाहक यांच्यामध्ये कायम वाद होत असतात फक्त बस लावण्यावरून परंतु या सर्व गोष्टीसाठी जबाबदार कोण असा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतो आणि यावरती प्रशासन तोडगा काढेल का कारण खाजगी वाहनांमुळे भाविकांना व गडावरील ग्रामस्थांना सुद्धा मनस्ताप सहन करावा लागतो कारण त्यांना अवाचे सव्वा भाडे देऊन रात्रीच्या वेळेस गडावरती येण्यासाठी प्रवास करावा लागतो… याकडे प्रशासनाचे लक्ष कधी जाणार असा प्रश्न गडावरील ग्रामस्थ व भाविक यांनी उपस्थित केला आहे