लासलगाव रेल्वे स्टेशनवर आलेला राखेने भरलेला रॅक नागरिकांच्या प्रचंड विरोधामुळे अखेर 25 तासानंतर रवाना
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव रेल्वे स्टेशनवर आलेला राखेने भरलेला रॅक नागरिकांच्या प्रचंड विरोधामुळे अखेर 25 तासानंतर रवान
लासलगाव रेल्वे स्थानकावर काल दुपारी चार वाजेच्या सुमारास राखेने भरलेला 56 डब्यांचा रॅक खाली करण्यासाठी आला असल्यामुळे नागरिकांनी तो खाली करण्यासाठी प्रचंड प्रमाणात विरोध केला रॅक खाली झाला तर पाच किलोमीटर परिसरातील नागरिकांच्या व्यावसायिकांच्या आरोग्याचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती परंतु जागृत नागरिकांनी प्रचंड प्रमाणात विरोध केल्यानंतर तसेच शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील मा .प .स. सदस्य उत्तमराव वाघ ,तालुका समन्वयक केशवराव जाधव ,विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष सुरज नाईक ,नामदेवराव शिंदे यांनी तात्काळ नाशिकचे खासदार हेमंत आप्पा गोडसे यांना त्यांच्या कार्यालयात काल सायंकाळी साडेपाच वाजता समक्ष भेटून संपूर्ण माहिती दिली.
असता खासदार हेमंत गोडसे साहेबांनी तात्काळ रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोन द्वारे संवाद करून राखेचा रॅक खाली केला तर लासलगाव परिसरातील नागरिकांचा आरोग्याच्या प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे स्थानिक नागरिकांनी रॅक खाली करण्यास प्रचंड विरोध आहेत त्यामुळे रॅक लासलगाव रेल्वे धक्क्यावर खाली न करता योग्य ठिकाणी खाली करावा त्या ठिकाणच्या नागरिकांना देखील त्रास होणार नाही याची देखील काळजी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर अखेर आज बुधवार सायंकाळी पाच वाजता 25 तासापासून उभा असलेला राखेने भरलेला 56 डाव्यांची रेल्वे गाडी रॅक लासलगाव रेल्वेच्या माल धाक्यावरून रवाना झाली त्यामुळे रेल्वे स्टेशन लासलगाव, टाकळी विंचूर, कोटमगाव परिसरातील नागरिकांच्या रेल्वे धक्क्यावरून राखेचा रॅक निघून गेल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे