
कर्नाटक उच्च न्यायालय येथिल मुख्य न्यायमूर्ती मा श्री प्रसन्न वराळे यांनी सपत्नीक श्री भगवती चरणी दर्शन घेवून संकल्प आरती केली तसेच विश्वस्त संस्थेच्या विविध विकास कार्य, सेवा सुविधा आणि प्रकल्पा बाबत माहिती घेतली. प्रसंगी विश्वस्त संस्थेच्या वतीने विश्वस्त ऍड श्री ललित निकम यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, मंदिर पर्यवेक्षक प्रशांत निकम, मुरलीधर गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते.