नूतन एस पी संदीप घुगे यांत्रिकी अभियंता, 2015, च्या बॅचचे आयपीएस अधिकारी,,,,,,,,,,,,,,,,,

सांगलीच्या नूतन पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकारी संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केले असून त्यांनी यापूर्वी रायगड उस्मानाबाद मालेगाव नवी मुंबई अकोला येथे विविध पदावर काम केले आहे लवकरच ते सांगलीच्या अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत श्री घुगे यांनी 2015, ते, 2017, या, कालावधीत मसूरी, उत्तराखंड, आणि हैदराबाद येथे प्रशिक्षण घेतले आहे, 2017, ते ,2019, या, काळात उस्मानाबाद येथे सहाय्यक अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, 2019, ते 2020, या काळात नाशिक ग्रामीणच्या मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी कर्तव्य पार पाडले आहे 2020, ते 2022, या काळात नवी मुंबई येथे एस आर पी एफ येथेही त्यांनी सेवा बजावली ,2022, ते 2024, या काळात, त्यांनी अकोल्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे या सेवाकाळात त्यांनी गुन्ह्याचा तपास गतीने करण्यात सहकार्यांना मोलाचे मार्गदर्शन केलेच शिवाय कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात ही त्यांचा हातखंडा आहे त्यांच्या कार्यालयात झालेल्या विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था ंच्या निवडणुका त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या, आहेत मालेगाव सारख्या संवेदनाशील शहरात जातीय सलोखा राखण्यात त्यांना यश आलेच शिवाय कोविड, 19, काळातही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यासाठी कल्याणकारी उपक्रम ही त्यांनी राबवले आहेत सांगलीतही उठावदार कामगिरी करू असा विश्वास त्यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केला आहे