आकाश मधाळे यांचा आमदार माननीय श्री राजू बाबा आवळे सौ यांच्या हस्ते जाहीर सत्कार

अतिग्रे तालुका हातकणंगले येथील माननीय श्री आकाश मधाळे यांची राष्ट्रीय पक्षाच्या हातकणंगले विधानसभा मागासवर्गीय सेल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार आमदार माननीय श्री राजू बाबा आवळे सो यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आडवोकेट चिंतामणी कांबळे व प्रशांत मधाळे सर यांनी केले यावेळी श्री आकाश मधाळे यांनी सांगितले की आज माझी हातकणंगले तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विधानसभा मागासवर्गीय सेल अध्यक्ष पदी निवड झाली आहे त्या पदाचे मी योग्य त्या पद्धतीने काम करीन हातकणंगले तालुक्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या समस्यांचे निरसन करीन व हातकणंगले तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष बळकट करीन असे कार्यक्रम प्रसंगी सांगण्यात आले
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड, उपसरपंच श्री बाबासो पाटील ,सदस्य भगवान पाटील माजी तंटामुक्त अध्यक्ष व माजी सरपंच श्रीधर पाटील ,अध्यक्ष हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटी श्री भगवान जाधव, माजी सरपंच पांडुरंग पाटील, महादेव पाटील ,बाबासाहेब शिंदे ,अमर पाटील, सारंग पाटील ,संतोष कांबळे ,भरत शिंदे, अशोक सूर्यवंशी ,मोहन शिंदे ,सिद्धार्थ कांबळे, प्रकाश सूर्यवंशी ,किशोर बोरगावे, उदय पाटील, उपाध्यक्ष हातकणंगले तालुका अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी श्री पिंटू किनिंगे व समस्त बौद्ध समाज व मातंग समाज व गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
शेवटी या कार्यक्रमाचे आभार माजी उपसरपंच संदीप सूर्यवंशी यांनी मांडले