ताज्या घडामोडी
चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे हायवेवर बांधलेली मजार अखेर प्रशासनाने काढली
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव-चांदवड तालुक्यातील सोग्रस फाट्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर मधोमध बांधलेली मजार ची विविध प्रसार माध्यमांवर पोस्ट वायर वायरल झाली होती.त्या अनुषंगाने माननीय आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता त्याची दखल घेऊन महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.त्या कार्यवाहीच्या अनुषंगाने काल मध्यरात्री सोग्रस फाट्यावर हायवेच्या मधोमध असलेली मजार जेसीबीच्या साह्याने रात्री काढण्यात आली.