तक्रार कर्त्याचे पंचायत समिती समोर अमरण उपोषण विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन सुद्धा अहवाल मिळन
लोणार/ शेख सज्जाद

लोणार तालुक्यातील तांबोळा ग्रामपंचायत भ्रष्टाचार सिध्द न होण्यासाठी पंचायत समिती कार्यालय चौकशीला 40 दिवस होवुन सुध्दा हेतुपुरस्कर चौकशी अहवाल देण्यास विलंब करीत आहे, यावरून पंचायत समिती कार्यालय भ्रष्टाचाराच्या पाठीशी असल्याचा आरोप
ग्रा.पं.सदस्य तथा भाजपा जिल्हा सचिव,बुलडाणा ग्रामपंचायत तांबोळा भ्रष्टाचाराबाबत दोन तक्रार व स्मरण पत्र देवुन वारंवार विचारणा केल्यानंतर चौकशी झाली असता चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे दि.9 नोव्हेबंर 2022 पर्यंत तक्रारीतील संपुर्ण मुदयानीशी अहवाल न मिळाल्यास दि.10 नोव्हेबंर 2022 पासुन पंचायत समिती कार्यालया समोर भाजपाच्या वतीने अमरण उपोषण पुकारण्यात येईल.अशा विषयाचे नमुद निवेदन उध्दव आटोळे,ग्रा.पं. सदस्य तथा भाजपा जिल्हा सचिव, बुलडाणा यांनी गट विकास अधिकारी लोणार यांना दिले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की,उध्दव आटोळे हे विदयमान ग्रामपंचायत सदस्य असुन त्यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे दोन वेळेस तक्रार अर्ज तसेच स्मरण पत्र देवुन सुध्दा अदयाप पर्यंत त्यांच्या अर्जावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. वारंवार स्मरणपत्र व पाठपुरावा केल्यानंतर अखेर दिनांक 27/09/2022 रोजी पंचायत समिती कार्यालयाकडुन तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली आहे. चौकशी होवुन आज रोजी 40दिवसाचा कालावधी झाला असतांना सुध्दा अदयाप चौकशी अहवाल देण्यात आलेला नाही.
ग्रामपंचायत तांबोळा येथे ग्रामपंचायतीने आर.ओ. मशीन खरेदी न करता लाखो रूपयाचे बिले काढली आहे. तसेच बांधकामे ही इस्टीमेट नुसार न करता निष्कृष्ट दर्जाचे केले असुन काही कामे अपुर्ण असतांना काम पुर्ण दाखवुन लाखो रूपयाचे बनावट बिले काढली आहेत याबाबत तक्रार माहे जुलै 2022 पासुन केली असता मात्र चौकशी ही तीन महीन्यानंतर विलंबाने करण्यात येवुन अदयाप पर्यंत चौकशीचा अहवाल देण्यात आलेला नाही.आज रोजी ग्रामपंचायतीने अपुर्ण कामे पुर्ण करणे सुरू असुन बनावट काढलेल्या बिलाच्या वस्तु आणुन ठेवणे सुरू आहे यावरून पंचायत समिती अधिकारी हे ग्रामपंचायत सरपंच/सचिव यांना वेळ देवुन चौकशी अहवाल देण्यापुर्वी केलेला भ्रष्टाचार दाबण्याचे प्रयत्न करीत असल्याचे यावरून स्पष्ट दिसुन येत आहे. यावरून ग्रामपंचायत तांबोळा यांनी केलेल्या लाखो रूपयाचा भ्रष्टाचारात पंचायत समिती अधिकारी यांचे सुध्दा संगणमत असल्याचे आम्हाला संशय होत आहे.तक्रारीच्या अनुषंगाने 1 ते 5 मुदयाचा परीपुर्ण अहवाल दिनांक 9 नोव्हेबंर 2022 रोजी न मिळाल्यास दिनांक 10 नोव्हेबंर 2022 पासुन पंचायत समिती लोणार समोर भाजपाच्या वतीने अमरण उपोषण पुकारण्यात येईल. असा ईशारा निवेदनाअंती देण्यात आला आहे. सदरील निवेनावर उध्दव माधवराव आटोळे, ग्रा.पं. सदस्य तथा जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा,बुलडाणा व शे. जावेद शे.यासीन तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक आ.भाजपा लोणार यांच्या सहया आहेत. गट विकास अधिकारी सदरील तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणार की, तक्रारकर्ते यांना उपोषण करावे याकडे मात्र नागरीकांचे लक्ष लागले आहे. एव्हढे मात्र खरे !