ताज्या घडामोडी

मुंबईहून अलिशान वंदे भारत एक्स्प्रेसने शिर्डीला जाताय; इथे पाहा तिकिटाचे दर

मुख्य संपादक राहुल वैराळ

Vande Bharat Train: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमधून अलिशान प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सर्व प्रवाशांना खिसा रिता करावा लागणार आहे.

 

पुणे -नाशिक मार्गाचे दर सर्वाधिक

 

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमधून अलिशान प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सर्व प्रवाशांना खिसा रिता करावा लागणार आहे. मुंबई-शिर्डी (नाशिकमार्गे) आणि मुंबई- सोलापूर (पुणेमार्गे) मार्गावरील ‘वंदे भारत’चे तिकीटदर आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. या तिकीटदरांत आयआरसीटीसीच्या खाद्यपदार्थांचा समावेश नाही. यामुळे प्रवासात चमचमीत खाण्यासाठी आणखी पैसे भरावे लागणार येत्या तीन दिवसांत दोन नव्या गाड्या मुंबईतून धावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेससाठी पुण्यापर्यंत चेअर कार डब्यात ५६० रुपये तर सोलापूरसाठी ९६५ रुपये मोजावे लागणार आहेत. एक्झिक्युटीव्ह श्रेणीसाठी १,१३५ रुपये तर मुंबई-सोलापूर या संपूर्ण प्रवासासाठी १,९७० रुपये मोजावे लागतील. मुंबई-साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’चे नाशिक रोडपर्यंतचे चेअर कार तिकीट ५५० आणि शिर्डीसाठी ८०० रुपये असे आहे. एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी अनुक्रमे ११५० आणि १६३० असे तिकीट दर असणार आहेत, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

 

मुंबई ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला पाच तास २० मिनिटे आणि मुंबई ते सोलापूर अंतर पार करण्यासाठी सहा तास ३० मिनिटे लागणार आहेत. यामुळे चहा आणि नाश्त्यासाठी अधिक रुपये खर्च करावे लागतील. रेल्वेने ठरवलेल्या प्राथमिक दरांमध्ये आयआरसीटीसीच्या खाद्यपदार्थांचा समावेश केलेला नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

 

आय आर सी टी सी करतेय काय

 

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची सुरुवात होण्यास अवघे ७२ तास शिल्लक असताना ‘आयआरसीटीसी’कडून अद्याप खाद्यपदार्थ आणि त्यांचे दर निश्चित झालेले नाही.

 

पुण्यासाठी तीन तास

 

‘वंदे भारत’च्या रूपाने राज्यातील दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या शहरांना जोडणारी आणखी एक गाडी सेवेत दाखल होणार आहे. मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस दुपारी ४.१०ला मुंबईहून रवाना होणार असून पुण्यात सायंकाळी ७.१०ला पोहोचेल; तर सोलापूरला रात्री १०.४०ला मुक्कामी असणार आहे. सोलापूरहून परतीचा प्रवास सकाळी ६.०५ वाजता सुरू होणार असून, पुण्याला नऊ वाजता आणि सीएसएमटीला दुपारी १२.३५ वाजता संपणार आहे

 

शिर्डी एका दिवसात

 

वंदे भारत’ सीएसएमटीहून सकाळी ६.१५वाजता रवाना होणार असून, दुपारी १२.१० वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास ५.२५ वाजता सुरू होऊन रात्री ११.१८ मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. यामुळे साई भक्तांना एका दिवसात दर्शन करून आपल्या घरी येणे शक्य होणार आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.