
त्रंबकेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली अंतर्गत हेदुलिपाडा, हेदअंबा या गावांमध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी लसीकरण झालेले असून आज पर्यंत तीन महिने होत आले तरी अजून लसीकरण झालेले नाही. व गरोदर मातांची तपासणी सुद्धा झालेली नाही तसेच लहान मुलांचे लसीकरण डोस दिले गेले नाहीत 15 डिसेंबर 23 रोजी लसीकरण करण्यात आले परंतु हेदअंबा येथील लाभार्थ्यांना 1 किलोमीटर पायी पायी रस्त्यावर बोलावून लसीकरण उन्हामध्ये करण्यात आले लसीकरण अंगणवाडी, शाळा, समाज मंदिर, या ठिकाणी झाले पाहिजे परंतु संबंधित डॉक्टरांनी रस्त्यावर लसीकरण करण्यात आले. तरी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे आंबोली पी.एस.सी. चे वैद्यकीय अधिकाऱ्याचे लक्ष नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत सी.एच.ओ. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटने करून करण्यात आली आहे.