ताज्या घडामोडी

शिरोळ स्टेट बँक शाखेस, 40, लाखाची फसवणूक, मैशाळ येथील ठकसेन संशयित अशोक कोरवी पोलिसांच्या ताब्यात कोल्हापूर सह सांगली जिल्ह्यात आर्थिक फसवणूक केल्याची चर्चा,,,,,,,

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ,, तालुका मिरज, येथील एका ठकसेनानी स्वतः ची मिळकत आहे असे बसवून शिरोळ येथील स्टेट बँकेच्या शाखेला तारण देऊन ,40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत स्टेट बँक शिरोळ शाखेचे शाखा अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे दरम्यान संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी याला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की म्हैसाळ, येतील संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी याने सिटी सर्व्ह नंबर ,273 ,मिळकत ही स्वतःची आहे असे बँकेला भासवले होते त्याने सदरची मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोळ स्टेट बँक शाखेला तारण देऊन ,39 ,लाख रुपयांचे कर्ज घेतले सदर कर्जाची रक्कम, 25,जुलै 20 19 रोजी बँकेच्या खात्यामधून उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अशोक कोरवी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर आज अखेर कर्ज व त्यावरील व्याज रकमेची बँकेला परतफेड केलेली नाही यामुळे सदरचे कर्ज थकीत झाले असल्याने या थकबाकीच्या रक्कम वसुलीबाबत शिरोळ स्टेट बँक शाखेने संबंधित कर्जदाराची पडताळणी केली असता संशयित आरोपी कोरवी यांनी बँकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे बुधवारी शिरोळ पोलिसात रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान कोल्हापूर सह सांगली जिल्ह्यात संशयित आरोपी कोरवी यांनी व्यक्तिगत तसेच सहकारी संस्थांना फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुल्ला अधिक तपास करीत आहे

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.