महाराष्ट्र पोलीस | मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय रामनगर सृष्टी, मिरारो पुर्व ता. जि. ठाणे

गुन्हे घरफोडी चोरी करणा-या सराईत आरोपी अटक पेल्हार पोलीस ठाणे, प्रकटीकरण पथकाची कामगिरी. –
पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०५/०१/२०२३ रोजी २०.०० वा. ते दि.०७/०१/२०२३ रोजी सकाळी ०९.२० वा. चे दरम्यान गाळा नं. ९/१०, नवजीवन सोसा., वसई (पु.) येथील फिर्यादी नामे श्री. मामुन हारुन पियार्जी, रा. गोल्डन चॅरिट हॉटेल समोर, डीमार्टचे मागे, वसई (पु.), यांचे पी. आर. जी. बाईक पॉईट नावच्या दुकानाच्या शटरचे लॉक तोडुन दुकानातील विविध कंपन्याचे मोटर सायकलचे पार्टस, डी. व्ही.आर., टी.व्ही., टुल्स असा एकुण २,९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने अज्ञात आरोपीतांविरुध्द पेल्हार पोलीस ठाणेत गु.रजि. नं. T५० / २०२३ भा.दं.वि.सं. कलम ४५४ ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता
नमुद गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नामे. १) राजेश कदम ऊर्फ घोचु, रा. कांदिवली, मुंबई, २) अजयन पाऊर विड्डू ऊर्फ पी. व्ही. रा. नालासोपारा (प.), ३) हरिंद्र गुप्ता, रा. बांद्रा, मुंबई यांस ताब्यात घेतले असता तपासादरम्यान त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नमुद आरोपीचे चौकशी दरम्यान त्यांचेकडून नमुद गुन्हा व पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल असलेले विविध गुन्हयांत चोरी केलला १) वेगवेगळया कंपन्यांचे मोटर सायकल पार्टस, २) स्टिल, ३) टि.व्ही. ४) एक ऑटो रिक्षा असा मुद्देमाल तसेच नमुद आरोपीतांनी गुन्हा करण्याकरीता वापरलेले टाटा एस कनीचा टेम्पो, मोटर सायकल, कटर, कटावणी, स्कुड्रायव्हर, पाना असा एकुण ०५,९६,९००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपीत यांचेकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.क्र. पोलीस ठाणे पेल्हार पेल्हार पेल्हार २ गुन्हा रजि. नंबर, कायदा व कलम T५० / २०२३, भा.दं.वि.सं. कलम ४५४,४५७,३८०,४११,३४ प्रमाणे मुळ गुन्हा) २२/२०२३, भा.दं.वि.सं. कलम ३७९ प्रमाणे, IT २९/२०२३, भा.दं.वि.सं. कलम ३८० प्रमाणे,
नमुद सराईत आरोपीत नामे. १) राजेश कदम ऊर्फ घोचु, याचेवर मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्हयांमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एकुण १६ गुन्हे दाखल असुन, आरोपीत नामे. २) अजवन पाऊर विडू
ऊर्फ पी. व्ही. याचेवर तुळींज, वाकोला मुंबई या पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली ०३ गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, विरार तथा अति कार्यभार परिमंडळ २, वसई, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाणेचे श्री. वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उप.नि. सनिल पाटील, पो.हवा. योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, पो. अंम संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, विरार कार्यालयातील पो.हवा. तारडे, नामदेव ढोणे यांनी केली आहे.