वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष श्री.पवन भाऊ पवार

वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष श्री.पवन भाऊ पवार तसेच निफाड तालुका अध्यक्ष श्री.रमेश जी गवळी साहेब यांच्या आदेशाने निफाड तालुक्याचे सचिव श्री. नितीन नाना गरुड यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ग्रामीण जिल्हाध्यक्ष उपोषणकर्ते श्री.विनोद भाऊ भोसले जे नाशिक येथे दलित व आदिवासी समाजांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत त्यांची नाशिकला उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाी केली. चर्चेतून समाजाच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील असा निर्धार देखील या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे निफाड तालुक्याचे सचिव नितीन नाना गरुड यांनी केला. ज्या मागण्यांसाठी उपोषणासाठी बसलेले आहेत या मागण्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीरपणे पाठिंबा आहे असे यावेळी ठणकावून सांगितले,त्याच वेळेस नितीन नाना गरुड यांनी फोनवरच नासिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे पवन भाऊ पवार यांच्या सोबत चर्चा करून दिली. त्याचबरोबर निफाड तालुक्याचे तालुका अध्यक्ष रमेश जी गवळी साहेबांसोबत देखील चर्चा करून दिली व लवकरच मार्ग काढणार असल्याची माहिती देखील दिली उपोषण कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.