लासलगाव महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव, ता. ६ : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.किशोर गोसावी सर होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, श्री.रावसाहेब खुळे व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील श्री.प्रभाकर गांगुर्डे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविधांगी कार्यक्षेत्रावर सविस्तर माहिती आपल्या भाषणात दिली.
श्री.प्रभाकर गांगुर्डे सर यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान समाज सुधारक, थोर कायदेपंडित, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यता निर्मूलनासाठी आपले जिवन खर्च करणारे असे एक थोर व्यक्ती होते असे विचार व्यक्त करत डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावरती प्रकाश टाकत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव आपल्या भाषणात केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता राजोळे या विद्यार्थिनीने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे यांनी केले तर आभार श्री.सुनिल गायकर यांनी केले.
सदर कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.