शिवजयंती निमित्ताने रायगडावर भाटगांव (चांदवड) येथील शिवसैनिकांनी स्वच्छता अभियान राबविले बद्दल सत्कार करण्यात आला
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव-दि. १९ फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावतंस,सिंहासनाधिश्वर,श्रीमंतयोगी,श्री,श्री,श्री, हिंदवी स्वराज्य संस्थापक,छत्रपती शिवाजी महाराज की जय.... 🚩🚩
अठरा पगड जातींना सामावून घेवून स्वराज्य निर्माण करणारा,स्रियांचा सामाजिक दर्जा उंचावणारा, स्त्रीमुक्तीची क्रांती करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्त्री जातीबद्दल उच्च प्रतीचा सन्मान राखणारा या राजाने सरंजामशाहित स्रियांची होणारी विटंबना,दास्यत्व,खरेदी-विक्री, स्त्री-मालकी यावर बंदी आणली. परस्त्रीस मातेसमान लेखणारा व शत्रुच्याही स्रियांचा सन्मान करणारा एकमेव राजा ,युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर भाटगांव येथील श्री.किरण मोरे, श्री.सुनील खैरनार, श्री. दिपक गवळी, श्री.भाऊसाहेब द्रौपदे, श्री. सर्जेराव धामणे, श्री.कैलास मोरे, श्री.सागर पोटे आदी शिवसैनिकांनी साफसफाई व स्वच्छता केली त्याबद्दल त्या सर्वांचा रायगडावर सत्कार करण्यात आला, त्यामुळे सर्वांचे हार्दिक अभिनंदन….