शिरोळ पोलिसाकडून मोटर सायकल चोरटे जेरबंद, सहा मोटरसायकल केल्या जप्त

शिरोळ – पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावातील मोटरसायकली चोरी करणाऱ्या नांदणी येथील दोन चोरट्यांना व तीन अल्पवयीन मुलांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त केले आहेत तसेच या गुन्ह्यातील उदगाव येथील संशयित आरोपी फरारी आहे अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक, डॉ, रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते, गेल्या दोन महिन्यापासून शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे बरेच गुन्हे दाखल झाले होते सदरचे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शिरोळ पोलिसांना दिल्या होत्या त्यामुळे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक डॉ, रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला सहाय्यक फौजदार राजू पुजारी हवालदार बाबा पटेल मधुकर मडिवाळ सावित्री खंडागळे पोलीस नाईक अभिजीत परब पोलीस कॉन्स्टेबल रहिमान शेख संजय राठोड तेजस्विनी कदम अभिजीत कोळी रहीम तुल्ला पटेल यांच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल गुन्ह्याची सखोल तपास करून व गोपनीय माहिती मिळवून शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील किशोर उर्फ दादासो बाळासो कांबळे,, वय 19, वर्ष, या दोघांना अटक केली तर यातील तिसरा संशयित आरोपी तम्मा बसवराज परशराम देखनाळकर, राहणार उदगाव, हा फरारी आहे तर सहभागी असणाऱ्या अन्य तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे अटकेत असलेल्या संशयित आरोपींनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत मोटर सायकल बॉक्सर एम,एच, 09, यु ,5828,, टीव्ही,एस सुझुकी एम,एच, 09, ए एच, 6201,, टीव्ही,एस, सुझुकी के ए , 23, एच, 7965, फॅशन प्लस , एम एच, 10, ए बी, 1031, टीव्ही एस सुझुकी एम,एच,09,, ए ई,1353, टीव्ही सुझुकी, एम एच, 09, डी,3854, या क्रमांकाच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केले आहेत