
जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धा नाशिक जिल्हास्तरावर एका दिव्यांग विद्यार्थीनीला अर्धा तास उशीर झाला म्हणून तेपण रेल्वे मुळे तरी तिला स्पर्धेपासून वंचित ठेवून तिच्याच शिक्षकाला धमकावण्याचे काम तेथील उपशिक्षणाधिकारी कोळी साहेब करताय.काल दि.५/०२/२०२४ रोजी पण स्पर्धा होत्या तेव्हा पण वेळ सकाळी ०९:०० वाजेची होती पण काल अधिकारी वर्ग २ ते ३ तास उशीरा आल्याने कालच्या स्पर्धा या तब्बल १२:०० वाजता सुरू झाल्या मग मला आता सांगा की अधिकारीवर्गासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षक पालक जर २ ते ३ तास उन्हात थांबू शकतात तर आज एका दिव्यांग विद्यार्थीसाठी आयोजक व अधिकारी वर्ग अर्धा पाऊण तास थांबू नाही शकत का ? आणि त्यात अशे उपशिक्षणाधिकारी दर्जाचा माणुस बाजू ऐकून न घेता न्याय देणे तर दूरच पण प्रामाणिक शिक्षकाला दमदाटी करण्याचे महान कार्य त्यांनी केलेय… नक्की कोणता आदर्श यांना या समाजापुढे ठेवायचा आहे हे व या अशा पध्दतीने स्पर्धा राबवून कोणती उद्दिष्टे त्यांना सफल करायची आहे हे न समजण्यापलीकडे आहे…माझ्यावर सूडबुद्धीने काही कार्यवाही झाली तर त्यात नवल वाटणार नाही…पण सत्य मांडण्यापासून आणि एका दिव्यांग विद्यार्थीनीला न्याय मिळवून देण्यास मी मागे हटणार नाही…