
सिन्नर – शहरातील उद्योग भवन परिसरात डिझेल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. चोरटे शिर्डी येथील सावळी विहीर येथे येत असल्याची गुप्त खबर सिन्नर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी शिर्डी येथील सावळीविहीर परिसरात सापळा रचून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हजारोचे डिझेल हस्तगत केले असून तेवढ्यावरच नव्हे तर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकून 150 लिटर डिझेल आणि काळ्या
रंगाची कार मिळून एकूण चार लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .