ताज्या घडामोडी
स्नेहल (बुल्ले) खेराडकर यांची राज्यकर निरिक्षक पदी निवड

महाराष्ट्र लोकसेवा(MPSC) आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत रुकडीच्या
स्नेहल विवेक खेराडकर (बुल्ले) यांची राज्य कर निरीक्षक स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर (एस टी आय) यां पदासाठी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर रुकडी व महात्मा गांधी विद्यालय रुकडी, येथे झाले महाविद्यालयीन शिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेज येथे तर
इलेक्ट्रीकल इंजीनीयरींग पदवी कराड गव्हर्मेट काॅलेज येथे झाले. यासाठी त्यांना माहेरचे आशीर्वाद व सासरचा पाठिंबा लाभला. एक आदर्श मुलगी, आई, पत्नी, सून, निवेदक, अशा विविध प्रकारच्या नात्यामधून प्रतिकुल परीस्थीतीतून यशस्वी झाल्या त्यांच्या या यशामुळे विविध स्तरांमधून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे