जळगांव ( गाळणे ) गावातील ग्रामस्थांचे ठेकेदारा विरूद्ध तीव्र आंदोलन
संपादक सोमनाथ मानकर

मालेगांव तालुक्यातील
दाभाडी गावासाठी रावळगाव येथील शेवाळी धरणातून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन जाणार आहे. आणि सदर पाईप लाईन ही जळगाव गावातून जातं असून गावाच्या माध्यवर्थी भागातून म्हणजे मेन डांबरी रस्ता फोडून ही पाईप लाईन जाणार आहे त्यामुळे गावातील डांबरी रस्ता, त्याखाली असलेल्या छोट्या मोठ्या केबल लाईन पाईप लाईन ह्या देखील फुटणार आहेत त्यामुळे ग्रामपंचायत जळगाव यांनी त्यावर हरकत दाखवली असून गावातील ग्रामस्थांचा देखील सदर पाईप लाईन ही गावातून नेण्यासाठी विरोध होतो आहे.
सदर पाईप लाईन साठी गावाच्या बाहेरून मार्ग काढून ही पाईप लाईन पुढे जाऊ द्यावी जेणेकरून गावाच्या रस्त्याच घराचं नुकसान होणार नाही आणि पाईप लाईन देखील सुरळीत पुढे जाईल असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
परंतु सदर कामाचा ठेकेदार हा आपले पैसे वाचविण्यासाठी दांडगाई करून काम सुरु ठेवत आहे त्यामुळे ह्या ठेकेदारा विरुद्ध तहसील अधिकारी तसेच पाणीपुरवठा विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार देण्यात आलेली आहे.
ही पाईप लाईन गावातून नेल्यास तीव्र आंदोलन छेडू असं गावाकऱ्याचं म्हणणं आहे यावेळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते