
तृणधान्य हे आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्वाचे आहे हे कृषी विभागाने दर्शविले. या संदर्भात तालुका विभागाने कार्यशाळा भरून महत्त्व सांगितले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी विंचूर येथे कृषी सहाय्यक एस एस माळी यांनी विद्यार्थ्यांना घरगुती जेवणात बाजरी ,ज्वारी व इतर कडधान्याचा वापर किती महत्वपूर्ण आहे याबाबत माहिती दिली जेवणात बाजरी, ज्वारी भाकरी खाणारे तृण धान्याचा वापर फारसा करत नसल्याने शरीरात लागणाऱ्या आवश्यक घटकांना अभावी विविध आजारांचा सामना सर्वसामान्य जनतेस करावा लागत आहे. आजाराला प्रतिकार करणारे पुरेसे घटक उपलब्ध नसल्याने हजार वर तोंड काढत आहे त्यामुळे दवाखान्यांचा खर्च वाढ होऊन जनता त्रस्त झाली आहे 2023 हे वर्ष शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे .
त्यामुळे आपल्या शरीरात ऋतु निहाय आहार बाजरी, ज्वारी, राजगिरा ,राळा ,नाचणी, वरई ,तीळ या तृण धान्यांचा आहारात वापर करावा त्यामुळे आपले शरीर हे सुदृढ राहील यासाठी कृषी विभागाने विविध कार्यक्रमामार्फत जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्ण धान्याच्या मोठ्या प्रमाणात वापर करून आरोग्य निरोगी ठेवण्याचे आव्हान केले आहे. याप्रसंगी कृषी सहाय्यक एस एस माळी ,टाकळी विंचूर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी, मंडळ कृषी अधिकारी लासलगाव सोमवंशी, साहेब ,कृषी पर्यवेक्षक के बी अहिरे मॅडम ,कृषी मित्र भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशा प्रकारचे उपक्रम प्रभात फेरी कार्यशाळा भरून समाजात सांगितले पाहिजे असे आव्हान कृषी विभागाने केली आहे