आयुर्वेदिक गोचीड गो या औषधाचा वापर करून जनावरे व गोठे गोचीड मुक्त करा… गोकुळ संचालक मा.आम डॉ. सुजित मिणचेकर

गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून देण्यांत येणाऱ्या गोचीड गो या आयुर्वेदिक औषधाचा वापर कशा पद्धतीने केला पाहीजे यांचे मार्गदर्शन श्री हनुमान सह दूध व्याव संस्था मर्या, चोकाक येथील डेअरीच्या दूध उत्पादक यांना गोकुळ संचालक मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर व डॉ. पिंपळगावकर यांनी केले. यावेळी बोलतांना डॉ.सुजित मिणचेकर म्हणाले आपण घर स्वच्छ ठेवण्यासाठी डेटॉलचा वापर करतो तसेच आपली जनावरे गोचीड गो औषधेचा वापर करून गोचीडी पासून जानवरांचे संरक्षण करूया. जनावरांच्या अंगावर फक्त १० ते १५ टक्के गोचीड असतात. उरलेले ८० ते ९० टक्के गोचीड हे आजूबाजूच्या परिसरात, गोठ्यामध्ये विशेषतः खाच खळग्यात, लाकडाच्या फटीमध्ये, भिंतींच्या भेगांमध्ये, गव्हाणीमध्ये लपून बसतात. त्यामुळे गोचीड निर्मुलन करताना फक्त जनावरांच्या अंगावरील गोचीडांचे निर्मुलन करून चालणार नाही. त्यासाठी एकाचवेळी जनावरांच्या अंगावरील सोबतच गोठ्यातील आजूबाजूच्या परिसरातही औषधाची फवारणी करणे गरजेचं आहे. गोचीड गो औषध व थायलेरिया लसीकरण गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांच्या वतीने मोफत करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. पिपळगावकर यांनी औषध पाण्यामध्ये किती प्रमाणात वापरावे यांचे माहिती दिली. तसेच उत्पादक यांच्या गोठ्यास भेट देऊन औषध फवारणी कशा पद्धतीने केली पाहिजे हे दाखवून दिले. हे औषध आयुर्वेदिक असल्याने फवारणी करताना जनावरांच्या डोळ्याला तोंडाला लागल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाही असे सांगीतले.
यावेळी संस्थेचे चेअरमन प्रीतम मुळीक, व्हा. चेअरमन जयसिंग पाटील, संचालक सुधाकर यादव, सुनील नंदीवाले, प्रकाश चव्हाण, दिलखुश कांबळे, महादेव माळी, नारायण कुंभार योगेश चोका ककर, प्रवीण माने, बाळू मंडले,, अमोल पाटील, संकलन अधिकारी, सुपरवायझर, दूध उत्पादक उपस्थित होते.