माणगाव श्री बिरदेव मंदिर सभा मंडप व भंडारखान्या चा पायाभरणी शुभारंभ सोहळा संपन्न
रुकडी / प्रतिनिधी

रुकडी – या सरकारने लोकांच्या श्रध्दा ‘ भक्ती भाव जपण्याचे काम केले आहे त्या मुळे मंदिर बांधणी अगर जिर्णोध्दार यासाठी सरकार सढळ हाताने निधी देत आहे असे उदगार हातकणंगाले तालुक्यातील माणगाव येथील श्री बिरदवे मंदिरा समोरील सभामंडप आणि भंडारखान्याच्या पायाभरणी शुभारंभ सोहळ्यामध्ये आ .प्रकाश आवाडे यांनी
काढले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणगावचे जेष्ठ नेते जिनगोंड पाटील होते .
आ प्रकाश आवाडे याच्या प्रयत्नामुळे माणगाव येथील ग्रामदैवत श्री बिरदेव देवालयास राज्य सरकारने ब वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा देऊन दोनं कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे त्या मधून मंदिर सभामंडपाचा पायाभरणी प्रकाश आवाडे आणि किशोरीताई आवाडे
यांच्या हस्ते तर भंडारखाना पाया खुदाई भगवान ढोणे महाराज यांच्या हस्ते करण्यात आला
या वेळी बोलताना आ.आवाडे म्हणाले की माणगाव हे ऐतिहासिक गाव आहे माणगाव आणि आवाडे कुटुंबियांचे जीवाभावाचे नाते असून या गावाने आमच्यावर पुत्रवत प्रेम केले आहे या गावच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी आहे येथील
डॉ आंबेडकराच्या स्मारकाचे काम अद्यापही अपूरे आहे त्याचाही पाठपुरावा सुरुअसून त्यासाठीही भरपूर निधी उपलब्ध करुन देणार आहे असे अश्वासन यावेळी दिले त्याचबरोबर धनगर समाजातील प्रलंबित असलेली घरकुलेही लवकर मंजूर होतील असे ते म्हणाले. यावेळी माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी विकास कामाचा निष्ठेने पाठपुरावा केल्ल्या
बध्दलत् यांचे भरभरून कौतुक केले
या प्रसंगी माणगाव ग्रामपंचायत आणि धनगर समाजाच्या वतीने आम प्रकाश आवाडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच सरपंच राजू मगदूम यांनी धनगर समाजाला दिलेले वचन पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करणेत आला
माणगावचे पोलीस पाटील करसिद्ध जोग यांनी आपल्या मनोगतामध्ये या गावाचे धार्मिक महत्व सांगितले .
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरपंच राजू मगदूम यांनी केले . कार्यक्रमास राहूल आवाडे प्रकाश दत्तवाडे शंकर देबाजेमामा उपसरपंच अख्तर भालदार माजी सरपंचं अनिल पाटील मुल्ला सर अनिल जगदाळे आर जे पाटील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य धनगर समाजाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. आभार मायाप्पा रुपणे यांनी
तर सूत्रसंचालन सविता माने आणि रामचंद्र जोग योनी मानले