ताज्या घडामोडी
केंद्रीय गृहमंत्री नाशिक दौऱ्यावर

सिन्नर प्रतिनिधी- केंद्रीय मंत्री अमित शहा,तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही प्रमुख नेते नाशिक दौऱ्यावर येणार आहेत नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने सत्तावीस जानेवारीला सकाळी दहा वाजता परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्याचे ठरविले असल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार असून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबई नाका ,येथे ही परिषद संपन्न होणार आहे. परिषदेनिमित्त बँकिंग क्षेत्रातील आव्हाने व व्यवस्थापनातील नवनवीन बदलांचा वेध घेणारे सहा परिसंवाद यावेळी होणार आहेत.