सामाजिक कार्यकर्ते यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आरोग्यमंत्र्यासह पालकमंत्री आमदार पोहचले घरी……
संपादक सोमनाथ मानकर

साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी राहणारे ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांची एक विशिष्ट ओळख आहे सप्तशृंगी गडावर कोणी अडचणीत असल्यास तात्काळ मदत करणे किंवा सप्तशृंगी घाटामध्ये किंवा इतर ठिकाणी कुठे अपघात झाला तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून यांना फोन केला जातो त्यानंतर पदाधिकारी किंवा प्रशासन यांना सांगून भाविकांना अडचण असेल ती सोडवल्या जातात यामुळे संदीप बेनके हे प्रत्येक अधिकारी व प्रशासनाच्या प्रत्येक व्यक्तीस ओळख असलेले व्यक्तिमत्व आज श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी आरोग्य मंत्री भारतीताई पवार व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आमदार नितीन पवार हे सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त गडावर आले .
असताना त्यांनी संदीप बेनके यांची विचारपूस करता वेळेस असे लक्षात आले की यात्रे उत्सव काळात त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ते आपल्या पर्यंत येऊ शकले नाही या गोष्टीचा थोडाफार विचार न करता केंद्रीय मंत्री भारती ताई पवार पालकमंत्री दादाजी भुसे व कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी त्वरित संदीप बेनके यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळेस संदीप बेनके याच्या परिवारांनी आलेल्या मान्यवरांचे आई भगवती चा फोटो व शाल देऊन सत्कार केला यावेळेस बेनके कुटुंबा सह गडावरील ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार भाजप शहराध्यक्ष प्रकाश कडवे धनंजय गायकवाड अजय दुबे रोहित बेनके विवेक बेनके व अनेक पदाधिकारी उपस्थित होते