
लासलगाव पोलीस स्टेशन ला बाबासाहेब शंकर गीरी रा पिंपळगाव नजीक ता निफाड यांनी दि २१/०६/२०२३ रोजी सायंकाळी लेखी खबर दिली की त्यांचा मुलगा युवराज बाबासाहेब गीरी वय १९ वर्ष हा दि २०/०६/२०२३ रोजी सकाळी उत्पन्नाचा दाखला, नाॅन क्रिमीलीयर सर्टिफिकेट काढण्यास लासलगाव गावात जातो असे सांगुन घरातुन बाहेर गेला तो अद्याप पावतो घरी परत आला नाही यावरून मनुष्य मिसींग रजि नं ३९/२०२३ प्रमाणे दाखल करण्यात आला असून सहा पोलिस निरीक्षक श्री राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सदर मीसींगचा तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास विश्वनाथ लाड हे करीत आहेत हा मुलगा कोणास आढळून आल्यास लासलगाव पोलीस स्टेशन शी संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे
लासलगाव पोलीस स्टेशन नंबर ०२५५०-266055
तपास अधिकारी देविदास लाड ८८८८८२५३५३