लासलगाव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बेसबॉल स्पर्धेत विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव:- नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे मुलींच्या जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. मुलींच्या बेसबॉल स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील एकूण ११ संघानि सहभाग घेतला. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना लासलगाव विरुद्ध एच.पी.टी महाविद्यालय नाशिक यांच्यात झाला त्यानंतर दुसरा उपांत्य सामना एम. एस. जी महाविद्यालय मालेगाव विरुद्ध नामपुर महाविद्यालय यांच्यात झाला तर अंतिम सामना लासलगाव महाविद्यालय विरुद्ध एम. एस. जी महाविद्यालय मालेगाव यांच्यात झाला या अंतिम सामन्यात लासलगाव महाविद्यालयाचा संघ विजयी झाला. उपविजेतेपद एम. एस. जी. महाविद्यालय मालेगाव यांना मिळाले. या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे उपसचिव डॉ. गोकुळ काळे, प्रा. नितीन अहिरराव, डॉ. सुरेखा दप्तरे, प्रा. अनिल कुमावत, डॉ. दिनेश कराड, प्रा. डॉ.लहानु जाधव, प्रा. तेजस कुलकर्णी, प्रा. डॉ. राजाराम कारे, प्रा. निरंजन गायकवाड हे उपस्थित होते. मुलींच्या बेसबॉल स्पर्धेत यशस्वी झालेल्या लासलगाव महाविद्यालयाच्या कु.कोमल आव्हाड, कु.नेहा ठाकरे, कु.आश्विनी गीते, कु.गायत्री तीपायले या चार खेळाडूंची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागीय स्पर्धेसाठी झाली. पुढील स्पर्धा या एचपीटी महाविद्यालय नाशिक येथे होणार आहे.
तसेच बिटको महाविद्यालय नासिक येथे मुलांच्या जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील एकूण ९ संघानि सहभाग घेतला. मुलांच्या बेसबॉल स्पर्धेत लासलगाव महाविद्यालयाचा मुलांचा संघ विजयी झाला. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या लासलगाव महाविद्यालयाच्या फुरखान शेख, आशिष शेजवळ, इम्तियाज सय्यद, दीपक आव्हाड या चार खेळाडूंची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागीय स्पर्धेसाठी झाली. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. नारायण जाधव, प्रा. गणेश जाधव यांनी विशेष प्रयत्न केले तसेच प्रा. रामेश्वर शिंदे, मंगेश कुऱ्हाडे, सचिन जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री गोविंदरावजी होळकर, प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.