. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे, येथील अंतिम वर्षातील.,.

डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे, येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अभियानाचा माणगाव येथे प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे असे मत सरपंच राजू मगदूम यांनी व्यक्त केले. या वेळी बोलताना ते म्हणाले म्हणाले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या यांनी अभ्यासलेल्या माहितीचा व त्यांच्या ज्ञानाचा गावक-यांना उपयोग होणार आहे. ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव व कार्यक्रम राबवण्याकरिता शेतकरी वर्गाकडून हि त्यांना मदत होईल. शेतीतील कामातून प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. विद्यापीठातील नवनवीन शेती विषयक माहिती, कृषी विद्यापीठ व कृषी महविद्यालयाच्या विविध संशोधनाची माहिती शेतक-यापर्यंत पोचविण्यासाठी कृषीकन्या शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहचत आहेत. शेतक-यानांही त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.एन. शेलार, डॉ. एस. एम. घोलपे, प्रा. व्ही. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या पल्लवी दादासो हांडे, वेदिका विजयकुमार कांबळे, अनामिका किरण घोलप, श्रद्धा बाळासो पांढरे, प्रतिक्षा दिपक खरात, मृणालिनी म्हाळसाकांत देसाई उपस्थित होत्या. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच डॉ. राजू मगदूम, उपसरपंच अख्तरहुसेन भालदार, सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामविकास अधिकारी बी.बी. राठोड, यांनी कृषी कन्यांचे स्वागत केले.