लासलगाव महाविद्यालयात प्रोग्रामर ऑफ द ईयर २०२३-२४ स्पर्धा संपन्न
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संगणक विज्ञान विभागाच्या वतीने आयोजित प्रोग्रामर ऑफ द ईयर २०२३-२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि बी. बी. ए. (सी. ए.) विभागाच्या प्रयोगशाळा या ठिकाणी झालेल्या *प्रोग्रामर ऑफ द ईयर २०२३-२४* स्पर्धेत एकूण चार फेऱ्या झाल्या. यात पहिल्या फेरीसाठी योग्यता चाचणी घेण्यात आली. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठी प्रोग्रामिंग कोडिंग चाचणी घेतली. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन फेऱ्या पार केल्या, त्यांची चौथी रॅपिड प्रश्नावली फेरी घेण्यात आली. या फेरीत एस. वाय. बी. बी. ए. (सी. ए.) या वर्गाचा *हर्षवर्धन अविनाश भुसारे* हा प्रोग्रामर ऑफ द ईयर २०२३-२४ चा विजेता ठरला, तर टी. वाय. बी. सी. एस. या वर्गाचा *सुरज अशोककुमार प्रजापती* हा उपविजेता ठरला. या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून प्रा. डी. सी. चव्हाण, प्रा. पूनम आहेर आणि प्रा. अनिता चव्हाण लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. योगेश पवार, प्रा. सुनिल भागवत, प्रा. समाधान जाधव, प्रा. माधुरी साबळे, प्रा. दिपाली खांडेकर, प्रा. अनुया नवले या सर्वांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.