रांगोळी द्वारे घडविले कृषि कन्यांनी हस्तकलेचे दर्शन

रुकडी, ता- हातकणंगले, जि- कोल्हापूर
रुकडी (ता- हातकणंगले) येथे डॉ.डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे यांच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाच्या अभियानाचा प्रारंभ झाला.
या कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांमार्फत रांगोळीच्या सहाय्याने रुकडीचा नकाशा रेखाटण्यात आला. त्यामध्ये ग्रामपंचायत, गावातील रस्ते, मंदिरे, दवाखाना, पोलीस चौकी, पोस्ट ऑफिस, रेल्वे मार्ग, शाळा, तलाव, विहिरी इ.रेखाटण्यात आले. या रांगोळीद्वारे कृषीकन्यांनी आपल्या हस्तकलेचे नाविन्यपूर्ण दर्शन घडवले. या रांगोळीच्या सहाय्याने ग्रामस्थांमार्फत गावाचा आढावा घेण्यात आला. या नकाशाच्या आधारे गावाच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून कृषी कन्यांचे कौतुक करण्यात आले. वरिष्ठ नागरिकांकडून गावच्या सध्य परिस्थिती बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी ग्रामस्थ व कृषी कन्या प्रज्ञा पाटील, अवंतिका पाटील, कोमल कदम, साक्षी पाथरवट, प्रीती चंदनशिवे, सुमिच्छा सूर्यवंशी, सानिका पाटील उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा.डी. एन. शेलार, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, प्रोग्राम ऑफिसर व्ही. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले