दुचाकी चोरणाऱ्या भेंडवडे च्या दोघांना सांगलीत अटक सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त एलसीबीची कारवाई,,,,,,,,,

सांगली – आष्टा येथून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना सांगलीत अटक करण्यात आली त्यांच्याकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबी चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली,, अरमान अब्दुल नदाफ, वय, 19, राहणार चौक सांगली मूळ राहणार भेंडवडे तालुका हातकणंगले,, धैर्यशील आनंदराव निकम, वय, 19, राहणार भेंडवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, अशी अटक,केलेल्यांची नावे आहेत शहरात दुचाकी चोऱ्याचे प्रमाण वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक निरीक्षक शिंदे यांनी तयार केले होते या पथकाला दुचाकी चोरट्यांना अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिले होत्या, पथक सांगलीत गस्त घालत असताना रेल्वे स्थानकाजवळील सह्याद्री नगर येथे दोघेजण विना क्रमांकाची दुचाकी, घेऊन थांबल्याचे दिसले पथकाने दोघांना ताब्यात घेतल, त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आष्टा तसेच सांगलीतून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्यानंतर त्यांच्याकडून चोरीच्या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या दोघांनाही संजय नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे एलसीबी चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील बिरोबा नरळे संदीप गुरव सागर लवटे मच्छिंद्र बेर्डे अमर नरळे विक्रम खोत संदीप नलवडे उदय माळी सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली