लासलगाव महाविद्यालयात फिट इंडिया सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नाशिक जिल्हा अंतर महाविद्यालयीन मुलांच्या बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ८ डिसेंबर २०२३ रोजी दोन मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व नियोजन लासलगाव महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी डॉ.नारायण जाधव व प्रा.गणेश जाधव यांनी केले. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, प्रा.उज्वल शेलार, प्रा.सुनिल गायकर डॉ.प्रदीप सोनवणे, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक यांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेतील अंतिम सामना हा लासलगाव महाविद्यालय विरुद्ध भोसला महाविद्यालय नाशिक यांच्यात घेण्यात आला. या स्पर्धेत लासलगाव महाविद्यालयाचा संघ विजयी झाला तर भोसला महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. यशस्वी खेळाडूंचा सत्कार व बक्षीस समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या हस्ते पार पडला. सर्व यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालय परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले व त्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.नारायण जाधव, प्रा.गणेश जाधव, डॉ.सुरेखा दप्तरे, प्रा.तेजस कुलकर्णी, डॉ.गोकुळ काळे, प्रा.रामेश्वर शिंदे, अंकुश व्हलगडे, अक्षय आंबेकर, विक्रांत धाकराव, विकी केदारे, विशाल कटाळे, बाबा हारळे, पांडुरंग जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.