ताज्या घडामोडी
Trending

कसबे तडवळे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तत्काळ चौकशी करण्याचे आदेश!

उपसंपादक - रेणुका पगारे

उस्मानाबाद जिल्ह्यातील पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या व तालुक्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या गावांपैकी एक कसबे तडवळे हे गाव आहे .या ग्रामपंचायतचा सन २०१६ पासून २०२२ पर्यंत चा घरकुल घोटाळा व १४-१५ वित्त आयोगाच्या निधीचा मोठा झालेला घोटाळा दैनिक जनमतचे प्रतिनिधी व माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर कदम यांनी माहिती अधिकारात उघड केला होता.याबाबत मिळालेली माहिती अशी की विस्ताराधिकारी पंचायत समिती उस्मानाबाद यांना १४-१५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या झालेल्या भ्रष्टाचाराबाबत २७ एप्रिल २०२२रोजी गट विकास अधिकारी यांचे चौकशीचे आदेश मिळाल्यानंतर २७ मे २०२२ रोजी चौकशी अहवाल सादर करून.संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांनी कमी न करता सन २०१६-१७मधील केलेल्या विकास कामांमधील खर्च व मूल्यांकन तफावत ४५५ रुपये सन २०१७-१८मध्ये गावातील सर्व भागांमध्ये एलईडी बल्ब खरेदी करण्यासाठी दोन लाख ७१ हजार रुपये पैकी दोन लाख ५० हजार ४१३ रुपये ची खरेदी करून वीस हजार ५८७ रुपये सन २०१८-१९ मध्ये २५-१५च्या निधी मधून सिमेंट रस्ता न बनवता बिल उचलून भ्रष्टाचार केल्यामुळे.तपस अधिकारी यांना मूल्यांकन मोजमाप पुस्तिका आढळून न आल्यामुळे दोन लाख ९०२ रुपये तर २०१९-२० मध्ये बस स्टँड परिसरामध्ये प्रवासी लोकांसाठी निवारा शेड उभ्या न करता ६३ हजार रुपये तसेच अंगणवाडी दुरुस्त न करता २३ हजार ७०० रुपये असा एकूण ३६ हजार ८४४ रुपये इतका भ्रष्टाचार विस्तार अधिकारी यांच्या तपासातून समोर आला असून बोगस कामे दाखवून शासकीय निधीचा अपहर केला होता.त्यामुळे संबंधित ग्रामसेवक ई .बी .माने व सरपंच मन्मथ आवटे यांनी प्रत्येकी एक लाख ५४ हजार ३२२रुपये इतकी रक्कम ग्रामपंचायत कार्यालय सामान्य पावती नमुना सात मध्ये दि.१२ ऑक्टोंबर २०२२ रोजी जमा केली असल्याने भ्रष्टाचार झाला असल्याचे सिद्ध झाल्याने.गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांच्यावर एक वर्षासाठी पगारवाढ स्थगिती व सरपंच यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम ३९(१) नुसार सहा वर्षासाठी निवडणूक लढवण्यासाठी अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली असल्याने .त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदार किशोर कदम यांनी जिल्हाधिकारी श्री.सचिन ओंबासे साहेब यांच्याकडे केलेली आहे.तसेच विस्तार अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना पुढील चौकशी करणे योग्य असल्याचे सांगितल्यामुळे गट विकास अधिकारी यांनी पाणीपुरवठा विभाग यांत्रिक विभाग व बांधकाम विभाग उप अभियंता जिल्हा परिषद उस्मानाबाद यांना आदेश दिले होते.त्या तपास कामे संबंधित अधिकाऱ्यांनी अनेक ग्रामपंचायतीला भेट देऊनही ग्रामपंचायत कडून त्यांना अभिलेख उपलब्ध करून दिल्यामुळे व विस्तार अधिकारी यांनी घरकुल घोटाळ्याचा अहवाल पुरावे देऊनही चुकीचा सादर केल्यामुळे जिल्हाधिकारी श्री.सचिन ओंबासे यांनी जिल्हास्तरीय समिती स्थापन करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल जी गुप्ता यांना दिले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.