लासलगाव येथे पोलिस टाईम्स न्यूज 24 ×7 पोर्टल चे शानदार उद्घाटन संपन्न
लासलगाव:( प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यातील संधान नगर विंचूर (तालुका निफाड) येथे पोलीस टाइम्स न्यूज 24×7 चे पोर्टल व यूट्यूब चैनल चे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर हायकोर्ट वकील अद्वैत्य चव्हाण व मराठी इंडियन आयडॉल ऋषिकेश शेलार पोलीस टाइम्स न्यूज- 24 चे मुख्य संपादक सलीम काझी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
पोलीस टाइम्स 24× 7 चे मुख्य संपादक राहुल वैराळ यांचा सत्कार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केला तर अद्वैत्य चव्हाण व ऋषिकेश शेलार यांनी चॅनलचे संपादक सोमनाथ मानकर व उपसंपादक रेणुका पगारे, कार्यकारी संपादक विकास कोल्हे यांना नेमणूक पत्र व ओळखपत्र प्रदान केले.
निफाड ब्युरो चे चिप देविदास निकम, व नांदगाव ब्युरोचे प्रशांत दिघे यांची निवड करण्यात आली
कार्यक्रमात जमलेल्या पत्रकारांना काळानुसार डिजिटल न्यूज पोर्टल कसे चालवावे ,पत्रकारिता कशी असावी ,व बातम्यांचे स्वरूप व सत्यता याबाबत श्री चव्हाण यांनी सखोल मार्गदर्शन केले.
लासलगाव चे पोलीस स्टेशन एपीआय राहुल वाघ सर यांनी स्वतः उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित असताना त्यांनी पत्रकार कसा असावा व पत्रकारिता कशी करावी तसेच आपण जी घाई घाईने बातमी तयार करतो त्यामुळे प्रशासनाचा काम वाढतं तरी आपण थोडसं थांबून व्यवस्थित प्रकारे माहिती घेऊनच बातमी लावावी असे मत यावेळेस यांनी व्यक्त केले व या ठिकाणी पोलिस टाईम न्युज 24/7 या चॅनलचे सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पोलीस टाईम्सन्यूज 24 चे मुख्य संपादक सलीम काझी, येवला वृत्तचे मुख्य संपादक शकिर शेख, स्टार टू चे मुख्य संपादक व ज्येष्ठ पत्रकार मनोहर देसले, न्याय भूमीचे मुख्य संपादक अभय पाटील, पोलीस फास्ट न्यूज चे मुख्य संपादक नानासाहेब जगताप ,टाकळी विंचूर गावच्या सरपंच अश्विनीताई जाधव व अनेक क्षेत्रातील मान्यवर व राजकीय पदाधिकारी हजर होते.
त्यांनी चॅनलला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत विकास कोल्हे कार्यकारी संपादक यांनी तर शेवटीआभार सोमनाथ मानकर संपादक यांनी मांनले.