ताज्या घडामोडी
रेल्वे कर्मचारी संतोष शिरसाठ यांच्या कुटुंबियांची छगन भुजबळ यांनी घेतली सांत्वनपर भेट

लासलगाव येथील रेल्वे विभागात कार्यरत असणारे कर्मचारी संतोष शिरसाठ यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, हरिश्चंद्र भवर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.