चांदवड ,लासलगाव विंचूर, सावळी विहीर राज्य मार्ग-७ राज्य मार्गातून राष्ट्रीय महामार्गात दर्जन्वित (वर्ग)करून चौपदरीकरण
मुख्य संपादक राहुल वैराळ

चांदवड ,लासलगाव विंचूर, सावळी विहीर राज्य मार्ग-७ राज्य मार्गातून राष्ट्रीय महामार्गात दर्जन्वित (वर्ग)करून चौपदरीकरण
करण्या बाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांची मागणी.
लासलगाव…
चांदवड, लासलगाव, विंचूर, सावळी विहीर राज्य मार्ग-७ हा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते समृद्धी महामार्ग यांना जोडण्यासाठी चांदवड लासलगाव ,विंचूर, सावळी विहीर फाटा अंतर ५९ किमी आहे.या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात यावा व चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी केंद्रीय सार्वजनिक वाहतूक व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.
या राज्य मार्गावर लासलगाव, विंचूर, चांदवड या ठिकाणी कांद्याच्या बाजारपेठा आहे. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार,छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या जिल्ह्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव हे कांदा व धान्य माल विक्रीसाठी घेऊन येत असतात.तसेच गुजरातहून साई दर्शनासाठी हजारो भाविक पायी पालखी घेवून शिर्डी येथे ह्याच मार्गाने येतात.स्थानिक प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून दररोज या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असून कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच हजारो नागरिकांना दुखापत झाली आहे. रस्त्याबाबत सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.भारतीताई पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना यावेळी दिली .तसेच रस्त्याला राष्ट्रीय दर्जा देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे शिष्टमंडळाला भारती ताईंनी आश्वासित केले .
चांदवड लासलगाव विंचूर सावळी विहीर फाटा या ठिकाणचे अंतर अंदाजे ५९ किलोमीटर असून हा राज्यमार्ग क्रमांक -७ हा राज्यमार्गातून तातडीने राष्ट्रीय महामार्गात दर्जन्वित (वर्ग) करण्यात यावा , चौपदरीकरण करण्यात यावे .ही शेतकरी बांधव, साई भक्त व प्रवासी वर्ग यांचे वतीने शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, कांदा व्यापारी प्रवीण कदम, विकास कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य केशवराव जाधव ,विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष भैय्या नाईक यांनी मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांची समक्ष भेट घेऊन रस्ता महामार्गात वर्ग करण्याबाबत विनंती करणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी दिली .